उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वयंभु मंदिरात अभिषेक
शेतकऱ्यांना करणार मोफत नारळ रोपांचे वाटप
तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची माहिती
जय महाराष्ट्र शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी ९.३० वाजता शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली स्वयंभू मंदिर येथे स्वयंभू मंदिर कणकवली
27/07/2024
सकाळी 9.30 वाजता अभिषेक व शेतकऱ्यांना नारळ रोप वाटप करण्यात येणार आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे,
महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आदी उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी , युवासेना पदाधिकारी,महिला आघाडी,तसेच सर्व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,
प्रथमेश सावंत यांनी केले आहे.
कणकवली, प्रतिनिधी