बिल्डिंग वरील छप्पर वादळी वाऱ्याने उडून मोठी दुर्घटना

सुदैवाने जीवित हानी टळली

इमारतीवरील संपूर्ण लोखंडी पत्र्याचे छप्पर गेले वाऱ्याने उडून

कणकवली आज दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने कणकवली नरडवे रोड वरील एका सात मजली बिल्डिंगच्या वरील लोखंडी अँगल सहित पत्रे असलेले छप्पर उडून उपजिल्हा रुग्णालयाच्या गडग्याजवळ रस्त्यावर येऊन पडले. अवघ्या काही सेकंदामध्ये घडलेल्या या प्रकाराने येथे एकच खळबळ उडाली. जवळपास दोन क्रेन ने उचलले न जाणारे एवढे हे वजनशीर हे छप्पर एवढ्या वेगाने वाऱ्यासोबत आले की कुणालाच काही कळेना. नरडवे चौकात असलेल्या सात मजली बिल्डिंगच्या बाजूच्या आसलेल्या सात मजली बिल्डिंगला क्रॉस करून हे लोखंडी छप्पर अँगल सहित रोडवर येऊन पडल्याने वादळी वाऱ्याच्या ताकतीचा या निमित्ताने अंदाज येतो. मात्र सुदैवाने यादरम्यान येथून कुणी वाहन किंवा पादचारी जात नसल्याने मोठी दुर्घटना व जीवितहानी टळली. परंतु यामुळे उपजिल्हा रुग्णालयाकडील एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद झाला. घटनेची माहिती मिळतात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वाऱ्याचा जोर एवढा होता की सात मजली बिल्डिंग च्या बाजूला असलेल्या दुसऱ्या तेवढ्याच उंचीच्या बिल्डिंग मधून वरील एक बिल्डिंग क्रॉस करून हे पत्र्याचे छप्पर सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर येऊन पडले. त्याच दरम्यान त्या छपराचा वरील एक पत्रा दोन रिक्षा उभ्या असलेल्या मधील भागात पडला. सुदैवाने रिक्षांचे नुकसान झाले नाही. एवढी मोठी दुर्घटना होऊन देखील मात्र दैव बलवत्तर म्हणूनच जीवीत हनी टळली.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!