कणकवलीकरांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा

कणकवली शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण

मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांची माहिती

कणकवली शहराची पाणीपुरवठा योजना 1982 पासून सुरु करण्यात आली असून त्यानंतर 1995 मध्ये नळयोजना मंजूर करण्यात आली. त्यामध्ये 2003 या वर्षामध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. या जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी दिली.
सद्यस्थितीत चालू असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रामधील मशिनरींची कार्यक्षमता कमी झाल्याने नुतनीकरण करणे गरजेचे होते. या कारणास्तव महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) या योजनेतून कणकवली नगरपंचायत जलशुद्धीकरण केंद्राचे काम करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्यामध्ये फ्लॅशमिक्सर, ट्यूब सेटलर, फिल्टर प्लांट मधील वाळू बदलणे, फिल्टर बेड आतून साफ करून वॉटरप्रुफ कोटिंग करणे, जॅकवेल येथे फ्लो मीटर बसविणे, टी.सी. एल टॅकचे पंप बदलणे, क्लोरीनेशन युनिट बसविणे इ कामे करून घेण्यात आली आहेत.
त्यामध्ये कनकनगर बंधारा येथील जॅकवेल मधून उपसा करण्यात येणारे पाणी समजण्यासाठी फ्लो मीटर बसविण्यात आला आहे. तसेच बदलण्यात आलेल्या फ्लॅशमिक्सर, ट्यूब सेटलरमुळे पावसाळयातून येणारे गढूळ पाण्यातील गाळ बसण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे फिल्टर प्लांट मधील वाळू बदलल्यामुळे व फिल्टर बेड आतून साफ करून वॉटरप्रुफ कोटिंग केल्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त क्षमतेने पाणीगाळणी प्रक्रिया होणार असून पारंपारिक टी.सी.एल. पावडर ऐवजी क्लोरीन गॅसचा वापर असलेल्या क्लोरिनेशन यंत्रणा पाणी निर्जंतुकरणासाठी करण्यात येणार आहे. असे श्री कंकाळ यांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!