आशिये गावातील नारायण आजगावकर यांचे निधन

आशिये टेंबवाडी येथील रहिवासी नारायण गोपाळ आजगावकर 90 यांचे बुधवारी सकाळी राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार मुले,बहीण सुना, भावजय,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
काही वर्षे ते कणकवली बाजारात पान विक्रीचा व्यवसाय करत. यामुळे आशिये गावासह कणकवलीत ही त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
आशीये उ.बा.ठा.शिवसेना गटाचे शाखाप्रमुख जगन्नाथ आजगावकर यांचे ते वडील होत.
कणकवली प्रतिनिधी