विशाळगडाजवळ मुस्लिम बांधवांच्या घरांची, मशीद ची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई करा



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधवांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

विशाळगड येथे हजरत मलीकरेहान अवलीया यांच्या दर्गावर विघ्नसंतोषी जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. सदरच्या दगड फेकीमध्ये अनेक मुस्लीम समाजातील महिला तसेच हिंदू समाजातील महिला, लहान मुले, तसेच स्थानिक लोक गंभीर जखमी झालेले आहेत. त्याशिवाय रहाणा-या लोकांची घरे उध्वस्त केलेली असून तोडफोड केलेली
आहे.
सदरची घटना व परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलीसांनी येणा-या करणा-या जमावास विशाळगडपासून ६ किलोमिटर गजापूर येथे थांबविले असता सदरच्या जमावाने गजापूर येथे बंद घराची कुलपे तोडून आतमध्ये घुसून प्रापंचिक साहित्याची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. तसेच घरातील घरगुती गॅस सिलेंडरचे स्फोट घडवून आणले आणि आयुष्यभर काबाडकष्ट करुन कमाविलेल्या प्रापंचिक साहित्याला आग लावण्यात आली. घरातील जिवनावश्यक, वस्तू तांदूळ, खाद्यतेल यांची नासधूस केली. सदरच्या प्रकारामुळे तेथील कुटुंबांची वित्तहानी होवून काही क्षणातच गजापूर येथील मुस्लीम समाजाची घरे उध्वस्त झाली. एवढेच नव्हे माथेफिरु जमावाने मुस्लीम समाजासाठी पवित्र मानल्या जाणा-या 'मशिदीची तोडफोड केलेली आहे. तसेच या मशिदीत नमाज पठणासाठी वापरला जाणारा मुसल्ला यालाही आग लावण्यात आली. काहींनी तर अक्षरशः मुस्लीम धर्माचे पवित्र कुराण फेकून दिले. असा किळसवाणा आणि
विकृत प्रकार गजापूर येथे घडलेला असून त्याचा सोशल मिडियावर व्हीडीओ व्हायरल झालेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही असे असताना काही संतप्त माथेफिरु जमावाने महाराजांच्याच गडावर संवीधान व कायदा धाब्यावर बसवून अविचारपणे वर नमूद प्रमाणे काळीज हेलावून टाकणारे निंदनीय कृत्य केलेले आहे.
त्यामुळे हे कृत्य करीत असतानाचा सोशल व्हीडीओ व्हायरल झालेला आहे. त्याचा आम्ही जाहिर निषेध करतो. त्यामुळे मुस्लीम समाजातील लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्या जमावातील विघ्नसंतोषी लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी, मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!