हळवल येथील सुनीता परब यांचे निधन

हळवल येथील रहिवासी सौ. सुनीता गोविंद परब. ( रा. परबवाडी वय 75 ) यांचे त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सौ. सुनीता ह्या अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होत्या त्यांच्यावर हळवल येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती,मुलगा, मुली,पुतणे,सुना, जावई, जावू, नातवंडे असा परिवार आहे. त्या हळवल गावचे जेष्ठ नागरिक गोविंद परब ( गाडीवाले ) यांच्या पत्नी तर पत्रकार उमेश परब यांच्या काकी होत.
कणकवली, प्रतिनिधी