सिलिका मायनींगसाठी हाय व्होल्टेज विद्युत लाईन टाकण्यास तीवरे ग्रामस्थांचा विरोध!

कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे शिष्टमंडळाने केली तक्रार

काम थांबवा अन्यथा आंदोलनास महावितरण जबाबदार राहील

तिवरे गावात चालू असलेल्या ज्ञानलक्ष्मी मिनरल्स अँड मायनींग नावे सिलिका वाळू कारखान्यास तिवरे गावातील शेतक-यांच्या शेत जमिनीतून त्यांच्या परवानगीशिवाय १९ KV (1100 वोल्टेज) च्या हाय व्होल्टेज लाईन चे खांब पुरले जात आहेत. या कामाला अर्जदार ग्रामस्थांचा विरोध असल्याचे निवेदन आज महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, सदर काम हे शेतक-यांची दिशाभूल करून तसेच गावाच्या संबंधित कोणत्याही विकास कामासाठी न होता एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक फायद्यासाठी होत आहे. कारण सदर काम थांबवण्या बाबत तिवरे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र सिताराम आंबेलकर यांना विचारले असता सदर काम हे ग्रामपंचायतीशी संबंधित नाही असे त्यांनी सांगितले. तसेच सरपंच रविंद्र सिताराम आंबेलकर व रघुनाथ लक्ष्मण चव्हाण हे दोघे आपल्या वैयक्तिक स्वार्थापायी या घातक कामास समर्थन देत आहेत. उद्या विद्युत प्रवाहाचे दुष्परिणाम शेती तसेच फळबागायतीना तसेच शेतक-यांना होणार आहेत. याचा तात्काळ विचार करून आपण हे काम वेळीच अशी आम्हा ग्रामस्थांची तसेच संबधित शेतक-यांची मागणी आहे.
तसेच सदर काम ग्रामस्थांनी थांबवले असता फौंडा महावितरण कार्यालयाचे श्री. कांबळी साहेब हे तिवरे येथे आले होते. जेव्हा या कामाबद्दल आम्ही विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज लागत नाही. आम्ही कोणाच्याही जमिनीत पोल टाकू शकतो. तसेच कामास विरोध झाल्यास आम्ही पोलीस आणून काम बळजबरीने करु असे ते म्हणाले. नक्की आम्ही काय समजायचे?
ज्ञानलक्ष्मी मिनरल्स अँड मायनींगमुळे गेली अनेक वर्षे सदर गावाला पाणी प्रश्न भेडसावत आहे. गावात आज पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असून हा प्रकल्प चालू असताना विहिरीचे पाणी दूषित होत आहे. येत्या पाच-सहा महिन्यात सदर कंपनीचा जमीन मालकाशी असलेला कायदेशीर करार संपत असून भविष्यात या विधातक प्रकल्पाचा त्रास गावाला भोगावा लागू नये म्हणून आपण तिवरे गावच्या ग्रामस्थांचा विचार करून सदर कंपनीला हा विद्युत प्रवाह आमच्या गावामधून देऊ नये. तिवरे ग्रामस्थांच्या तक्रारीचा गांभिर्याने विचार करून वेळीच कारवाई करून होणारे विद्युत प्रवाह देण्याचे काम यांबवावे अन्यथा आम्हास आंदोलन करावे लागेल. त्याचप्रमाणे हे काम कोणाच्याही ताकदीचा गैरवापर करून करण्यात आल्यास ग्रामस्थांनी कायदा हातात घेतल्यास होणा-या दुष्परिणामास प्रशासन जबाबदार असेल. असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी वासुदेव भट,वैभव महाडेश्वर, प्रसन्न महाडेश्वर,माजी सरपंच बाळा पावसकर, राजू चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य निलेश परब, गुरव,कदम, उमेश प्रभुदेसाई, बाबू ताम्हणकर व इतर उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!