रा.प. आगारात साजरा होणार “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

दर सोमवारी व शुक्रवारी आयोजन
विभागनियंत्रक अभिजित पाटील यांची माहिती
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १५ जुलै २०२४ पासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सुचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येणार आहे. सदर उपक्रमास विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या व रा.प. कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, सुचना ऐकून घेतील. त्या तांतडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असे एस. टी. महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ. माधव कुसेकर यांनी मत व्यक्त केले आहे.
तरी रा.प. सिंधुदुर्ग विभागातील आगारात विभाग नियंत्रक प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्याकरीता खालीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर करीत आहेत.
आगार सावंतवाडी सोमवार १५/०७/२०२४, मालवण शुक्रवार १९/०७/२०२४, कणकवली सोमवार २२/०७/२०२४, देवगड शुक्रवार 26/7/2024, विजयदूर्ग सोमवार 29/7/2024 वरील दिलेल्या वेळापत्रकानुसार रा.प. आगारात सकाळी १०.०० ते 2.०० या वेळेत “प्रवासी राजा दिन’ साजरा करण्यात येणार असून सदर वेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा महाविद्यालये आपल्या समस्या, तक्रारी, सुचना लेखी स्वरुपात मांडू शकतात व “प्रवासी राजा दिन” दुपारी 3.०० ते 5.०० या वेळेत “कामगार पालक दिन” साजरा करण्यात येणार असून सदर वेळेत संघटना व रा.प. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बाबतीतील प्रश्न (रजा मंजुरी, कर्तव्यासंबंधी, वेळापत्रकासंबंधी व प्रमादीय कारवाई) तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे तात्काळ निराकरण करतील. तरी सर्व प्रवासी बंधू-भगिनींनी व रा.प. कामगार यांनी याचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन अभिजीत बजरंग पाटील, विभाग नियंत्रक, रा.प. सिंधुदुर्ग विभाग केले आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली