मुंबईला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच पावसाचं पाणी रेल्वे रुळांवर साचल्याने लोकल सेवा ठप्प पडली. त्यामुळे काल शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आज मंगळवारीही मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्भूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, यत्रंणांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने मुंबईला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे.

गेल्या ४८ तासापासून राज्यात जोरदार पाऊस बरसतो आहे. त्यामुळे राज्यातील नद्या-नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. अनेख भागात पावसाचं पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरलं. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे. मुंबईसह उपनगराला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड-रत्नागिरीलाही मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, आणखी पुढील चार दिवस असाच पाऊस असेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे

.

error: Content is protected !!