मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी खारेपाटण ग्रामपंचायत येथे महिलांसाठी विशेष ग्रामसभा संप

या ग्रामसभेसाठी महिलांकडून समाधान व्यक्त
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी व या योजनेबद्दल जनजागृती करण्यासाठी दि. 8/7/2024 रोजी दु. 3:30 वा महिलांसाठी खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या सभेत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. खाती उघडन्यापासून ते नोंदणी पर्यंत सर्व माहिती महिलांना सांगण्यात आली. काही महिलांनी आपल्याला पडलेले प्रश्न, शंका देखील या सभेत मांडले त्याचे योग्य पद्धतीने निरसन करून महिलांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. ही खास महिला ग्रामसभा लावल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शेकडो च्या सख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी ग्रामविस्तार अधिकारी वेंगुर्लेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेची माहिती देत या योजनेपासून कोणतीही पात्र महिला वंचित राहणार नाही. याची ग्वाही दिली. व तश्या सूचना अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सी. आर. पी, महिला मंडळाच्या अध्यक्षा, बचतगटाचे अध्यक्ष यांना केल्या.व प्रत्येक वाडीत सर्वेक्षण करून माहिती गोळा करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या. तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी ही योजना 100% यशस्वी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या पार पडलेल्या विशेष महिला ग्रामसभेस खारेपाटण उपसरपंच -महेंद्र गुरव, सर्व सदस्य, जयदीप देसाई, मनाली होनाळे, सुधाकर ढेकणे, क्षितिजा धुमाळे, किरण कर्ले, दक्षता सुतार, आस्थाली पवार, व अंगणवाडी सेविका, महिला बचत गट पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ महिला यांनी उपस्थिती दाखवली.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण