न्यू इंग्लिश स्कूल आचरा चे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

आचरा–अर्जुन बापर्डेकर
परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले. या शाळेचे एकूण पाच विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पास होत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. यात
पूर्वा परशुराम गुरव , रुद्र संजय जाधव वेदिका पंढरीनाथ करवडकर , सई अंकुशराव घुटूकडे , मिहिर सदानंद पाताडे यांचा समावेश आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई ,शालेय समिती आचरा,मुख्याध्यापक , शिक्षक , पालक,शिक्षकेतरकर्मचारी यांचे कडून अभिनंदन करण्यात आले आहे





