काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न
चोरट्यांना मांजरेकर यांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याची गरज
कणकवली तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या कणकवली गांगोमंदिरनजीक च्या घरात चोरीचा प्रयत्न करताना मध्यप्रदेश मधील वृद्ध महिला आणि दोन अल्पवयीन मुलगे आणि एका अल्पवयीन मुलीला पकडण्यात आले. सोमवार 1 जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रदीप मांजरेकर आपल्या घरी आले असता त्यांना घरालगत चोरीच्या उद्देशाने संशयास्पद अवस्थेत आढळली. तसेच पितळी समई आणि भांडी वगैरे साहित्य गायब झाल्याचे दिसून आले. संशयित एमपी मधील एका वृद्धेसह तीन अल्पवयीन मुलांना मांजरेकर यांनी पकडून कणकवली पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असा तक्रार अर्ज दिला. त्यानुसार बीएनएस 128 पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता घरफोड्याच्या बाबतीत सतर्कता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली असून याबाबत या संशयतांची कसून चौकशी होण्याची मागणी देखील मांजरेकर यांनी केली आहे.
कणकवली प्रतिनिधी