युवा संदेश प्रतिष्ठान यांच्या मार्फत दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व मोफत वह्या वितरण समारंभाचा शुभारंभ माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आज संपन्न झाला. यावेळी युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी या इयत्तेमधील प्रथम तीन क्रमांकांना मिळविणाऱ्या एकूण 15 विद्यार्थ्यांना सुमारे 6000 किमतीचे डिजिटल वॉच देऊन युवा संदेश प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय श्री संदेशजी सावंत साहेब तसेच युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सन्माननीय सौ. संजना सावंत मॅडम व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
प्रतिवर्षाप्रमाणे कनेरी हायस्कूल मधील 650 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 वह्या यांचे वितरण करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय श्री संदेशजी सावंत साहेब यांनी दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या भविष्यामध्ये यापेक्षाही चांगला अभ्यास करून आपल्या कनेडी हायस्कूलचे नाव आपल्या पालक शिक्षकांचे नाव उज्वल करावे यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतमध्ये युवसंदेश प्रतिष्ठान च्या सर्व उपक्रमांचे मुक्तकंठाने प्रशंसा केली.
कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्षा सन्माननीय सौ संजना सावंत मॅडम, ग्रामपंचायत सांगवेचे सरपंच सन्माननीय श्री संजयजी सावंत, उपसरपंच सन्मान श्री प्रफुल काणेकर, सांगवे माजी सरपंच सन्मान श्री विजय भोगटे, ग्रामपंचायत सदस्य श्री राजेश साबळे, सन्माननीय अशोकजी कांबळे, सन्माननीय श्री. सुरेश सावंत, दिगवळे सरपंच सन्माननीय श्री संतोष गावकर, गांधीनगर सरपंच सन्माननीय श्री मंगेश बोभाटे, सन्मान श्री दीपक नांदगावकर, पत्रकार सन्माननीय श्री विनय सावंत सन्माननीय, श्री रॉबर्ट डिसोजा सन्माननीय श्री संजय, सावंत सन्माननीय श्री प्रदीप सावंत कनेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री. सुमन दळवी सर, सन्माननीय श्री बुरान सर तसेच सर प्रशाळेतील सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुमन दळवी सर यांनी केले. कार्यक्रमाची सूत्रसंचालन सह आभार प्रदर्शन सन्मान श्री प्रसाद मसुरकर सर यांनी केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण