कुडाळ एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडले !

नवीन वेळापत्रक लागू करण्यावरून चालक वाहक आक्रमक
कुडाळ एसटी आगारात आज, १ जुलै पासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलेले आहे. हे वेळापत्रक चुकीचे असून मनमानी पद्धतीने तयार केले असल्याचा आरोप एसटी वाहक आणि चालकांनी केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात आज दुपारी १२ वाजल्यापासून चालक आणि वाहकांनी कामबंद आंदोलन केले. कुडाळ आगारात एसटी बसेस, चालक आणि वाहक कमी आहेत. त्याचा फटका प्रवाशी वर्गाला बसतोय. याबाबत कुडाळ एसटी आगारातील अधिकारी वर्ग मात्र गप्प असल्याचे दिसून आला. बसेस नसल्याने याचा फटका प्रवाशांना बसला. यात प्रामुख्याने शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना फटका बसला