मराठा समाज प्राथमिक शिक्षकांच्यावतीने ७ जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ

मराठा समाज प्राथमिक शिक्षकांच्यावतीने कणकवली तालुका मर्यादित विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रम रविवार ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत मराठा मंडळ सभागृह, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे

इयत्ता १० वी ७५% ,१२ वी ६०% किंवा त्यापेक्षा अधिक गुण संपादन केलेल्या मराठा समाजातील विदयार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.तसेच ५ वी ,८ वी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थी, नवोदय विद्यालय निवड विद्यार्थी यांचाही गुणगौरव होणार आहे.
यावेळी सन्मानचिन्ह, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान केला जाईल.सदर कार्यक्रमला येताना गुणपत्रकाची छायांकित प्रत (झेरॉक्स) आणणे अनिवार्य आहे.या कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.तरी निकषात बसणाऱ्या सर्व मराठा समाजातील १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी वेळीच उपस्थित राहावे .असे मराठा प्राथमिक शिक्षकांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी श्री हेमंत राणे 9404169984,सचिन सावंत 9021858597 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जे शिक्षक जुलै २०२३ ते जून २०२४ या वर्षात सेवानिवृत्त झाले आहेत आणि सन २०२३/२४ या वर्षात विविध आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत,त्या सर्व शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!