नाटळ येथील कृष्णाजी सावंत यांचे निधन

कणकवली तालूक्यातील नाटळ हुमलेटेंब वाडी येथील रहिवाशी कृष्णाजी शंकर सावंत ८८ यांचे शानिवार दि. २९ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहीत मुली, जावई, नातवंडे , भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना कणकवली येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नसल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. एसटी महामंडळाचे निवृत्त कर्मचारी दिलीप राणे यांचे ते सासरे होत.
कणकवली प्रतिनिधी