ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या विद्यार्थ्यांचे इंडियन ऑलिम्पियाड परीक्षा आणि जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे मध्ये
इंडियन ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या मध्ये कू.ओम तेली (इयत्ता ५वी) कु .प्रदीप साटम ( इयत्ता १ ली) कु. रक्षिता गावकर( इयत्ता ७ वी) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले, त्याचप्रमाणे जिल्ह्यास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु.गौरेश तायशेटे व कु.यश पवार यांनी यश प्राप्त केले त्यांचाही मान्यवरांकडून गौरव करण्यात आला .”उत्कृष्ट नृत्यांगना पुरस्कार” चिमणी पाखरे ग्रुप कुडाळ यांच्यातर्फे कु.भूमी मर्गज (इयत्ता २ री) हिला मिळाला तिलाही सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ .वैष्णवी मोरवेकर मॅडम, को ऑर्डिनेटर श्री.निलेश घेवारी सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.