म ल देसाईंचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा

शिक्षणमंत्री मा. दिपकभाई केसरकर यांची खास उपस्थिती

दिनांक 29 जून रोजी संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य संयुक्त सरचिटणीस श्री मल देसाई सर यांच्या सेवापूर्ती शुभेच्छा समारंभास महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक भाई केसरकर हे आवर्जून उपस्थित राहिले. यावेळी शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते श्री म.ल. देसाई सर यांचा सत्कार करण्यात आला.
समारंभ प्रसंगी बोलताना माननीय शिक्षण मंत्री यांनी देसाई सरांबद्दल गौरोदगार काढले. श्री देसाई सर यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर काम करताना अनेक उपक्रम राबवून मुलांचां सर्वांगीण विकास घडवून आणला. तसेच संघटनात्मक भूमिकेतून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठवला व शिक्षकांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत माननीय शिक्षण मंत्री यांनी माननीय देसाई सर यांना शिक्षण विषयक राज्यस्तरीय कमिटीमध्ये स्थान देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी माननीय देसाई सर यांनी माननीय शिक्षण मंत्री यांना तोडामार्ग तालुका शिक्षण विभाग आस्थापनेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती केली.
यावेळी त्यांच्यासोबत माननीय रामचंद्रआंगणे साहेब मा. राजन पोकळे, नंदु गावडे , नंदू शिरोडकर, आबा केसरकर उपस्थित होते

error: Content is protected !!