विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटण्यात आले ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थांना शिक्षणात मदत मिळावी व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश मोफत भेट म्हणून दिला गेला . यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ . सौ साळुंखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आले. मार्गदर्शन करतांना चेअरमन डॉ सौ साळुंखे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगती कशी करावी या विषयी विचार मांडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. मुख्याध्यापक पिराजी कांबळे सरांनी सर्व विद्यार्थांना शैक्षणिक प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी