फोंडाघाट चेकपोस्टवर पकडलेली ती 38 लाखाची रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित

पोलिसांनी रक्कम दिली होती तहसील कार्यालयाच्या ताब्यात
तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती
फोंडाघाट चेकपोस्ट येथे एका व्यवसायिकाची पोलिसांनी तपासणी दरम्यान ताब्यात घेतलेली 38 लाख 67 हजार 900 रुपयांची रोकड तहसीलदार कार्यालया च्या ताब्यात दिल्यानंतर ही रक्कम असा आयकर विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. फोडा घाट चेक पोस्ट येथे ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कार (mh 09 fb 4078) मध्ये तब्बल 38 लाख 67 हजार 900 रुपयांची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान ही रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी विसंगत उत्तरे दिली. दरम्यान एका कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाची ही रक्कम असल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहींना माल देत असलेल्या मालाची वसूल केलेली रक्कम घेऊन हे दोघेजण जात होते. जीएसटी चुकवून चेक द्वारे पेमेंट न करता कॅश पेमेंट घेऊन अशा प्रकारे जीएसटी चुकवण्याचा हा प्रयत्न असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या तपासणीनंतर ही रक्कम महसूल विभागाच्या ताब्यात दिली होती. या चेकपोस्टवर कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे व सागर देवार्डेकर यांनी ही कारवाई केली होती. 19 जून रोजी ही कारवाई केल्यानंतर ही रक्कम कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या स्वाधीन करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी सदरची रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. त्यामुळे आता या रकमेबाबत पुढे काय निर्णय होतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली