फोंडा हायस्कुच्या मुख्याध्यापक पदी अजितकुमार देठे यांची नियुक्ती न झाल्यास आंदोलन!

कास्ट्राईब शिक्षक संघटने कडून माध्यमिक प्रशासनाला इशारा

कणकवली :महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय कविता शिंपी यांची भेट घेण्यात आली विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली .सदर वेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम , कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष संजय पेंडुरकर सरचिटणीस अभिजित जाधव , जिल्हाउपाध्यक्ष किशोर यादव व इतर पदाधिकारी उपस्थित होते .
सदर वेळी फोंडा हायस्कूलचे अजित कुमार देठे यांना सेवाजेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद देणे नियमान्वये गरजेचे आहे . तरिही त्यांना मुख्याध्यापक पदापासुन वंचित ठेवण्यात आले आहे . तसेच त्यांना विनाकारण लेखी पत्रे देवुन त्रास देण्यात येत आहे . ते मागासवर्गीय कर्मचारी असल्याने त्यांना मुख्याध्यापक पद मिळू नये अश्या पद्धतीने त्यांच्या सोबत शालेय प्रशासन कारवाई करत आहे . सहा महिण्यापुर्वी सेवाजेष्ठतेत नांव घुसवुन एका कर्मचाऱ्याला मुख्याध्यापक पदी बसवण्यात आले आहे . या बाबतीत सदर शाळेस भेट देवुन तात्काळ कारवाई करावी अन्यथा माध्यमिक शिक्षण विभागासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला .
तसेच 6 डिसेंबर 2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी नियोजनात करण्यात आली होती सदर सुट्टी शाळा नियोजन रजा यादीत नाही या बाबतीत कास्ट्राईब शिक्षक संघटना पदाधिकारी आक्रमक होवुन प्रश्नांचा भडीमार केला . गणेश चतुर्थी सुट्टी संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवसापेक्षा कोणत्याही जिल्ह्यात नाही मात्र या जिल्हयात अनंत चतुर्थी पर्यंत साधारण दिवाळी सुट्टी एवढी रजा दिली जाते त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जास्त सुट्टी दिल्याने अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होत नाही . मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . ही बाब शिक्षणधिकारी यांनी कबुल केली . तसेच 6 डिसेंबर रोजी ठरलेली सुट्टी देण्या बाबत कास्ट्राईब संघटनेने पत्र द्या आपण सदर सुट्टी बाबत पत्रक काढले जाईल असे सांगितले .
वडाचापाट हायस्कुल प्रशालेत अनुकंपा तत्वावर पात्रता व शाळेच्या संस्थेत रिक्त जागा असताना नचिकेत पवार यांची नियुक्ती करण्याबाबत माध्यामिक शिक्षण विभागाने वारंवार कळवूनही शालेय प्रशासन चालढकलपणा करत आहे तरि या संदर्भात तात्काळ कारवाई करावी अन्यथा शालेय प्रशानावर तात्काळ कारवाई करण्या बाबत कास्ट्राईब शिक्षक संघटनेने मागणी केली . शिक्षकांच्या इतर प्रश्नांवर वरही चर्चा करण्यात आली सभेत शेवटी कास्ट्राईब संघटना सरचिटणीस अभिजित जाधव यांनी माध्यमिक प्रशासनाचे आभार व्यक्त केले .

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!