मौजे फोंडा येथील वन संज्ञा क्षेत्रातील वृक्षतोड परवाना प्रकरण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

जमीन मालकाची मुख्य वन संरक्षक यांच्याकडे तक्रार

कणकवली – फोंडाघाट येथील मुरकर यांचे मालकी सर्वे क्रमांक 456/5 क्षेत्रातील वृक्षतोड परवाना प्रकरणाबाबत जनार्दन विठोबा मूरकर यांनी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना निवेदन दिले असून सदर निवेदनामध्ये खोटी तक्रार करून माझी बदनामी करणाऱ्या दीपक शिरोडकर यांच्यावर व खोटा अहवाल सादर करून वन विभागाची प्रतिमा खराब केल्याप्रकरणी संबंधित यांचे वर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

फोंडा येथे श्री मूरकर यांचे मालकी सर्वे क्रमांक ४५६/५ या क्षेत्रातील वृक्षतोडीसाठी परवानगी मागितली होती. ती त्यांना वन विभागाने ऑनलाइन प्रक्रिया द्वारे दिली होती. तथापि काही संभ्रमामुळे वन विभागाने सदरचा परवाना रद्द केला होता. सदरचा परवाना रद्द करताना सदर क्षेत्रात वन संज्ञा असल्याचा समज करून घेऊन वनविभागाने परवाना रद्द केला होता. त्या संबंधात मी माझ्याकडे असणारे कागद पत्र तपासून पाहिले असता त्यामध्ये वनसज्ञा बाबत काहीही नमूद नाही तरीसुद्धा माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने श्री दीपक शिरोडकर यांनी वन विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे मला प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास झाला आहे. माझ्या मालकी सर्वे क्रमांक 456 /5 या क्षेत्रात वन संज्ञा आहे की नाही याबाबतची पूर्ण चौकशी न करता एका तक्रारदाराच्या तक्रारीनुसार विभागीय वनाधिकारी कोल्हापूर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून त्यांच्या मार्फत चौकशी केली सदरची चौकशी मोघम स्वरूपात केली असल्यामुळे व कोणत्याही कागदपत्राचे खातरजमा न करता माझी आणि वन विभागातील कर्मचारी अधिकारी यांचे बदनामी केली आहे. तरी सदर प्रकरणाची फेर चौकशी करून वस्तुस्थिती सह कागदपत्र तपासून व वन वनसज्ञ बाबत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे उपलब्ध असणारे कागदपत्राचे तपासणी करूनच निर्णय घ्यायला पाहिजे होता. तो निर्णय न घेता तक्रारदार श्री दीपक शिरोडकर सेवानिवृत्त वनाधिकारी यांचे दबावाखाली वनविभागाने संबंधित कर्मचाऱ्यांवर नाहक कारवाई केली त्यामुळे वन विभागातील अधिकारी कर्मचारी सुद्धा मानसिक दडपणा खाली असल्यासारखे वापरात आहेत. त्यामुळे सदर माझ्या स्वतःच्या मालकी सर्वे नंबर ची खोटी तक्रार करून वनविभागास कारवाई करण्यास भाग पाडणारे श्री दीपक शिरोडकर यांच्यावर आणि त्यांच्या दबावाखाली काम करून अहवाल दाखल करणारे श्री दिलीप भुर्के यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी आणि आपल्या क्षेत्रातील झाडांना वृक्षतोडीस परवानगी द्यावी अशी मागणी श्री मूरकर यांनी मुख्य वन संरक्षक कोल्हापूर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत त्या वेळचे वनक्षेत्रपाल श्री घुणकीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!