राजश्री चौकेकर यांचे निधन

समाजसेवक संदीप चौकेकर यांना मातृशोक
कणकवली तालुक्यातील शिरवल खासकीलवाडी येथील रहिवासी श्रीमती राजश्री रघुनाथ चौकेकर (वय ७०) यांचे शनिवारी १५ जून रोजी दुपारी एक वाजता अल्पशा आजाराने शिरवल येथे निधन झाले.त्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे परीचित होत्या. सार्वजनिक कार्यक्रमात त्या हिरीरीने सहभागी होत असत.त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे,सुना, एक विवाहित मुलगी,जावई,दीर,भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल, सिंधुदुर्ग चे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक श्री.संदीप चौकेकर यांच्या त्या मातोश्री होत. शिरवल खासकीलवाडी येथील स्मशानभूमीत श्रीमती राजश्री चौकेकर यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिरवल गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या जाण्याने शिरवल गावावर शोककळा पसरली होती.
कणकवली, प्रतिनिधी