वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक कारवाई

आंबोली वर्षा पर्यटनाला आता सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वनखात्याने निर्बंध जारी केल्यानंतर आता पोलिसांनीही खास धूम स्टाईल पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आंबोली वर्षा पर्यटन हंगामात धबधब्यासह मुख्य अन्य पर्यटनस्थळांवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सावंतवाडी पोलीस सतर्क आहेत तसेच आवश्यक ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी दिली. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात आवाज करत गाड्या चालविणाऱ्या धूम बाईकस्वारांसह काळ्या काचा लावून गाड्या फिरविणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठीआवश्यक त्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. आंबोली पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर कांबळे यांच्याशी संपर्क साधला दिली. असता, त्यांनी ही माहिती ते म्हणाले, आंबोली पर्यटनस्थळावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारी प्रशासनाकडून आवश्यक पोलीस घेण्यात येणार आहे. अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यात येणार असून मद्यधुंद अवस्थेत धागडधिंगा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक तेथे पोलीस बंदोबस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कांबळे म्हणाले, शहरातील धूम बाईकस्वारांबाबत तक्रारी आहेत. याबाबत कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!