आचरा पोलीस स्टेशन चे सुनील जाधव यांची निरीक्षक पदी बढती

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांची पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली असून मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बढती बद्दल आचरा पोलीस स्टेशन तर्फे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस कर्मचारी ,मिनाक्षी देसाई, मिलिंद परब, सुदेश तांबे, दिपक चव्हाण, मनोज पुजारे, महेश जगताप, ज्योती परब,स्वप्नाली तांबे,स्वाती जाधव, प्रतिभा जाधव ,अमित हळदणकर आदी उपस्थित होते.
फेब्रुवारी मध्ये जाधव यांनी आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार स्विकारला होता. या भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ते नेहमी तत्पर असत.त्यांची पोलीस निरीक्षक पदी झालेल्या बढती बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.