उभादांडा-नवाबाग येथील तरुणाची आत्महत्या

वेंगुर्ले, भादांडा-नवाबाग येथील आनंद अरुण मोरजे (३५) या तरुणाने सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वेंगुर्ले पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. उभादांडा- नवाबाग येथील आनंद अरुण मोरजे याने सोमवारी दुपारी आपल्या राहात्या घराच्या खोलीत दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गळफास घेतल्यानंतर श्वास कोंडल्याने त्याच्या शरीराची धडपड झाली. यात गळफासासाठी लावलेली दोरी तुटून तो खाली पडला. खोलीतून आलेल्या मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराने आजारी असलेली त्याची आई तात्काळ त्या खोलीत गेली. आनंद मोरजे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत निपचीत खाली पडलेला दिसताच तिनें मोठ्याने हंबरडा फोडला. त्यामुळे चुलतभाऊ व शेजारी त्या ठिकाणी धावत आले. त्यांनी आनंदला वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर करीत आहेत

error: Content is protected !!