मालवण काळसे बागवाडीवमद्ये अनधिकृत वाळू व्यवसाय करणाऱ्या होड्या पकडल्या

कर्ली खाडीत भर रात्री रंगला थरार

शेकडो ग्रामस्थ जमले नदीपात्रात

वाळू उत्खननास बंदी असताना सुरू होत उत्खनन.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे मात्र यावर प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. मात्र मालवण मधील काळसे बागवाडी येथील ग्रामस्थ वाळू माफियांच्या हैदोसाला कंटाळून त्यांनी वाळू तस्करी करणाऱ्या आठ बोटी पकडले. बागवाडी येथील शेकडो ग्रामस्थानी भर नदीपात्रात जाऊन होड्या अडवून ताब्यात घेतल्या यावेळी आठ होड्या वाळू व परप्रांतीय कामगारांसह ताब्यात घेण्यात आल्या. दरम्यान रात्री उशीरा महसूल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मालवण, प्रतिनिधी

error: Content is protected !!