खारेपाटण येथे शिकारीसाठी जाताना पकडलेल्यांमध्ये देवगड मधील पाच जणांचा समावेश
काडतुस ची बंदूक व 5 काडतुसे जप्त
खारेपाटण वरून राजापूरच्या दिशेने जात असताना बलेनो कारची तपासणी केली असता शिकारीच्या उद्देशाने जात असताना सोबत काडतुस च्या बंदुकीसहित जिवंत काडतुसे घेऊन जात असताना देवगड मधील पाच जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खारेपाटण चेक पोस्ट या ठिकाणी संशयित आरोपी बलेनो कारमधून देवगड हुन राजापूरच्या दिशेने जात असताना या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये संशयित आरोपी जितेंद्र बाबाजी पाळेकर वय -40 रा. मुटाट पाळेकरवाडी तालुका देवगड, गोपाळ लक्ष्मण पाळेकर वय -54, रा. मुटाट पाळेकरवाडी तालुका देवगड, विसंगत विश्वास साळुंखे व 31 वर्ष रा. मुटाट बौद्धवाडी तालुका देवगड, विनोद राजाराम साळुंखे व 36 रा. मुटाट बौद्धवाडी तालुका देवगड, संतोष सखाराम पाळेकर वय 50 वर्ष रा. मुटाट पाळेकरवाडी तालुका देवगड हे सर्वजण विनापरवाना काडतुस ची बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. या संशयित आरोपींकडून 20 हजार रुपये किमतीची बंदूक, 5 जिवंत काडतुसे, 700 रुपयाची हेडलाईट, आकाशी रंगाचे कव्हर व बलेनो कार 6 लाख असा एकूण 6 लाख 23 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
दिगंबर वालावलकर /कणकवली