कणकवलीतील कालच्या राड्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांची कारवाई
आपापसात मारामारी करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी काल छत्रपती शिवाजी महाराज चौकात कणकवली मध्ये झालेल्या राड्यातील कणकवली व कुडाळ मधील एकूण चार संशयित आरोपींवर कणकवली पोलिसात भादवी कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे यांनी फिर्याद दिली आहे. काल कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आपापसात वाद होत हाणामारीचा प्रसंग घडला होता. या प्रकरणी आज कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यामध्ये अमोल चिंदरकर कलमठ, सतीश चिंदरकर कलमठ, प्रज्वल वर्दम कणकवली, योगेश घाडी कुडाळ या एकूण चौघांवर भादवि कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
दिगंबर वालावलकर /कणकवली