कणकवली तालुक्यात कलमठ भागामध्ये आकाशात जेट विमानाच्या घिरट्या
कणकवली तालुक्यातील प्रशासन याबाबत अनभिज्ञ
विमान ठराविकच भागात आकाशात घिरट्या घालण्यामागील नेमके कारण काय?
कणकवली तालुक्यातील कलमठ भागामध्ये आज सकाळपासून एक जेट विमान कलमठ सह त्या आसपासच्या भागामध्ये आकाशात घिरट्या घालताना ची घटना समोर आली आहे. मात्र याबाबत तालुका प्रशासनाकडे अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने हे जेट विमान हे नेमके कोणत्या कारणामुळे या भागात घरट्या घालत आहे. किंवा हे विमान भरकटले की कसे? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. याबाबत कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटने संदर्भात वेंगुर्ला प्रशासनाकडे चौकशी करत वेंगुर्ल्यामध्ये काल बुडालेल्या खलाशांचा शोध घेण्याकरिता हे विमान आले होते का? याची खातरजमा केली असता खलाशांच्या शोधा करता हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आले होते मात्र अशा प्रकारे जेट विमान बोलवले नसल्याची माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे कलमठ भागात आज सकाळपासून फिरत असलेले हे जेट विमान नेमके या भागामध्ये फिरण्याचा किंवा या भागांमध्ये वारंवार आकाशात घिरट्या घालण्याचा नेमका संबंध काय? त्याची कारणे काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जात असून कणकवली तालुका पोलीस प्रशासन देखील या संपूर्ण घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विमानाबाबत नेमकी स्पष्टता लवकरात लवकर करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.