न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा कला व वाणिज्य विभागाचे बारावी परीक्षेत उज्वल यश

धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा बारावीच्या निकालात आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवला.कला विभागात प्रविष्ट ४३विद्यार्थ्यांनपैकी ४२विद्यार्थी उत्तीर्ण होऊन९७.६७टक्के निकाल लागला. तर वाणिज्य विभागात प्रविष्ट ९२पैकी९१विद्यार्थी पास होउन प्रशालेचा निकाल ९८.९१टक्के लागला. कला विभागात मिस्बा तैयब काझी८९.८३टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळविला. तर द्वितीय कुमारी सानिया दत्तात्रय मळगी हिने ८८.५०टक्के गुण मिळविले . तर कुमार विशाल परशुराम धुरी यांनी ८०.१७ टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक प्राप्त केला .वाणिज्य विभागात कुमारी संजना शरद पवार ८८.१७ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली. द्वितीय निर्झरा संदेश मालंडकर ८७.३३टक्के गुण मिळविले .तरअल्फीजा साजिद मुजावर ८५.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, सचिव अशोक पाडावे तसेच सर्व समिती सदस्य,स्थानिक स्कूल कमेटीचे निलीमा सावंत,राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर,बाबाजी भिसळे, रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे यांसह सर्व शिक्षक पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!