हुंबरट मधील वाहळाची कोसळलेली भिंत पावसाळ्यापूर्वी बांधून द्या!
ग्रामस्थ सतीश पाटकर यांची सा. बां. विभाग व तहसीलदारांकडे मागणी
पावसाळ्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती
हुंबरट गावातील सर्व ग्रामस्थांची जुनी पायवाट या मोडीव वाहळाच्या भिंतीवरून सुरु होती. सदर भिंत ही पूर्णपणे कोसळलेली आहे. त्यामुळे जाणा-या येणा-या लोकांचा अपघात होवु शकतो.
पुर्वीच्या ग्रामस्थांनी सदर भिंत श्रमदानातून बांधली होती व शेती केली होती. आज सदर भिंत कोसळली तर त्याखाली संपूर्ण १० ते १५ शेतक-यांची शेती ही पाण्याखाली येवून वाहून जाणार आहे. कणकवली, कोल्हापुर, फोंडा मार्ग देखील पावसाळ्यात वाहून जात बंद होवु शकतो. त्याठिकाणी वस्तीत पाणी घुसुन पांचाळ कुटुबियांच्या ५ ते ६ घरांना धोका पोहोचु शकतो. त्यांच्या घरात राहणा-या २० ते २५ माणसांना त्याचा धोका पोहोचु शकतो. तरी सदर ठिकाणची प्रत्यक्ष पहाणी करुन सदर भिंत या पावसाळयापुर्वी आर.सी.सी. बांधकाम करुन द्यावी अशी मागणी श्री पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व कणकवली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे