आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून हरकुळ बुद्रुक मधील नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप सुरू!

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी नुकसानग्रस्तांच्या बाबतीत केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
नुकसान भरपाई पासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहता नये अशी केली मागणी
काल कणकवली तालुक्यात हरकुळ बुद्रुक मध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त ग्रामस्थांना आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून तात्काळ मदत म्हणून सिमेंट पत्रे, कौले व कोने यांचे वाटप आजपासून सुरू करण्यात आले. माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत हे वाटप ग्रामस्थांना करण्यात आले. यामध्ये हरकुळ बुद्रुक खडकवाडी व शेखवाडी मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या ठिकाणी वाटपास सुरुवात करण्यात आली. याबरोबर तालुक्यातील हळवल व अन्य गावांमध्येही हे वाटप करण्यात येणार असून प्राथमिक टप्प्यात हरकुळ पासून वाटप हाती घेण्यात आल्याची माहिती माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांनी दिली. आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून 200 पत्रे, 3 हजार 500 हजार कौल व 500 कोने वाटप सुरू करण्यात आले. दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदतीचा हात पुढे करण्यात आला असून, शासनाच्या माध्यमातून देखील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली जाणार असल्याची माहिती श्री. सावंत यांनी दिली. आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी हरकुळ बुद्रुक मध्ये भेट देत या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत देखील चर्चा केली. नुकसानग्रस्तांना जास्तीची भरपाई मिळून कशी देता येईल व याचबरोबर एकही नुकसानग्रस्त भरपाई पासून वंचित राहताने यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी श्री सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. शासन पातळीवर लागणारे सर्व सहकार्य केले जाईल मात्र नुकसानग्रस्तांना नुकसानी पासून भरपाई पासून वंचित राहू देऊ नका असे श्री सावंत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच आनंद ठाकूर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राकेश परब यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.