खारेपाटण येथे महायुती च्या कार्यकर्त्यांची नारायण राणे यांच्या प्राचारात बाजी

खारेपाटण येथे संपन्न महायुतीची महारॅली
नारायण राणे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास
लोकसभा निवडूक 2024 चे मतदान अवघ्या काही दिवसावर आले असून प्रचारांचे वादळ जास्त वेगाने घोंगवत आहे. खारेपाटण येथील महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे आपल्या महायुती गटाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.मतदार राजाच्या घरोघरी जाऊन त्यांची भेट घेऊन नारायण राणे यांचा प्रचार करत आहेत. घरोघरी कमळ निशाणी पोहचवण्यासाठी भाजपा चे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.खारेपाटण विभागातील सर्व महायुती च्या कार्यकर्त्यांची नारायण राणे यांच्या प्रचारात बाजी असून नारायण राणे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा विश्वास महायुती चे सर्वच पदाधिकारी व्यक्त करत आहेत.आज शनिवार दि.4मे रोजी सकाळी 10:30वाजता खारेपाटण येथे नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महायुती ची भव्य रॅली काढण्यात आली.सर्वच महायुती चे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने या सहभागी झाले होते.या प्रचार रॅलीतखारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव,पं. स. सदस्य -तृप्ती माळवदे,भारतीय जनता पार्टी पक्षाचे वॉरियर्स श्री रमाकांत राऊत,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा युवा प्रमुख श्री सुकांत वरुणकर, उपतालूका प्रमुख मंगेश गुरव,भाजपाचे -सुधीर कुबल, सरिता राऊत, लियाकत काझी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते सुधाकर ढेकणे,इस्माईल मुकादम,तंटामुक्ती समिती अध्यक्ष -सुहास राऊत,ग्रा.पं सदस्य गुरुप्रसाद शिंदे, भाजप कार्यकर्ते विजय देसाई, किशोर माळवदे, रफिक नाईक,वीरेंद्र चिके,सुरेंद्र कोरगावकर, सौ. कोरगावकर,संतोष रोडी, कुबल गुरुजी, मधुकर गुरव, विठ्ठल गुरव,शेखर शिंदे,शेखर कांबळे, सदानंद तावडे,उज्ज्वला चिके,साधना धुमाळे,अमिषा गुरव,दक्षता सुतार, किरण कर्ले,जयदीप देसाई,प्रणय गुरसाळे,प्रमोद जाधव,संदीप सावंत, उदय बारस्कर,अरुण कर्ले, महेश राऊत,राजू राऊत याच्यासह महायुतीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थिती होते. नारायण राणे यांना निवडणुकीत वियजी करणार आणि रत्नागिरी -सिंधुदुर्ग चे खासदार बनवणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





