नागवे मध्ये नारायण राणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागेश्वर मंदिरातून केला प्रचाराचा शुभारंभ
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर नागवे भाजप कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी नागेश्वर मंदिर नागवे येथे प्रचाराचा नारळ फोडून भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कमळ या निशाणी समोरील बटण दाबुन मतदान करण्याबाबत आवाहन करत प्रचाराला सुरुवात केली .
नागवे गावचे सरपंच सौ.सिद्धिका जाधव , उपसरपंच श्री.महेंद्र कुडाळकर , ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत भोसले, बूथ अध्यक्ष श्री. सचिन खेडेकर बूथ अध्यक्ष शशिकांत सातवसे राजू पाटकर मंगेश तेली काका सातवसे आबा मोरजकर बाबा मोर्ये मा.सरपंच सत्यवान गावकर मा.सरपंच आर्डेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





