वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.2 गावातील उ.बा.ठा चे अनेक कार्यकर्त्यांचा जय महाराष्ट्र करून भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश

वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.2 मधील युवा कार्यकर्ते मंदार रावराणे,तेजस रावराणे , वैभव रावराणे, संजय रावराणे, महादेव रावराणे, रुपेश रावराणे, स्वागत रावराणे, प्रणय रावराणे, अक्षय रावराणे, सचिन रावराणे,अभय रावराणे,सुधाकर रावराणे, अमित रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 गावातीलठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी आमदार नितेश राणे, दिलीप रावराणे, रितेश सुतार, पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!