मालवण परिसरातील १०वी, ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयक मोफत कार्यशाळा, नोंदणी सुरू!

मालवण शहर आणि आसपासच्या गावांतील १०वी ते १२वीतील विद्यार्थ्यांसाठी दि. १२ मे २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ ह्या वेळेत, मामा वरेरकर नाट्यगृहात करिअर विषयक एक मोफत कार्यशाळा होणार आहे. टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना ही या कार्यशाळेची आयोजक आहे.
या कार्यशाळेत संरक्षण (आर्मी, नेव्ही, एअरफोर्स) क्षेत्रातील विविध संधींविषयी श्री संजय सावंत, BE(मेकॅनिकल), निवृत्त वरिष्ठ उपमहाप्रबंधक, BEL मार्गदर्शन करतील तर बांधकाम क्षेत्रातील विविध संधींविषयी श्री उमेश धारगळकर M.Tech.(स्ट्रक्चरल) आय आय टी (मुंबई), डायरेक्टर, धारगळकर टेक्नोसिस हे मार्गदर्शन करतील. आपापल्या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक लाभलेली ही कार्यशाळा पूर्णपणे निःशुल्क आहे.
मालवण,कट्टा,मसुरा, कुडाळ अशा ठिकाणांहून २७० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. जागा मर्यादित असल्यामुळे गुगल फॉर्म भरून आगावू नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक विद्यार्थी खाली दिलेल्या लिंकवरून गुगल फॉर्म भरून या कार्यशाळेसाठी नाव नोंदवू शकतात. सोबतचा QR कोड स्कॅन करूनही फॉर्म भरता येईल.
प्रत्येक विद्यार्थ्यासोबत एका पालकानेही यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती नोंदणी केल्यानंतर कळविण्यात येईल.
संपर्क- 9082212474, 9529786781
नोंदणीसाठी लिंक/ QR कोड:
https://forms.gle/KqJw2zsrUSb3qK4S8