गोपुरीत राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास शिबीर ; अद्वैत फाऊंडेशन चे आयोजन

11 ते 15 मे दरम्यान निवासी शिबीर

कणकवली : अद्वैत फाऊंडेशन कणकवली च्या वतीने राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबीराचे आयोजन गोपुरी आश्रम वागदे येथे 11 मे ते 15 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात वय वर्षे 10 ते 20 वयोगटातील मुलांना सहभागी होता येईल.गोपुरी आश्रम वागदे चे अध्यक्ष डॉ राजेंद्र मुंबरकर यांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आलेल्या या निवासी शिबिराला राष्ट्र सेवा दल चे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. गोपुरी आश्रम येथील चिकू च्या बागेत संपन्न होणाऱ्या या 5 दिवसीय निवासी शिबिरात कॅलेस्थिनिक्स, नृत्य, लेझीम, योगा, झांज, पथ नाट्य, दांडिया आदींसह बौद्धिक व्याख्यान, ग्रेट भेट उपक्रमांतर्गत समाजातील दिग्गजांच्या भेटी आदी उपक्रमांतून सहभागी शिबिरार्थ्याचे व्यक्तीमत्वाला वेगळा साज मिळतो. अधिक माहितीसाठी अद्वैत फाऊंडेशन च्या अध्यक्ष सरिता पवार मोबा. 9604655844 सचिव राजन चव्हाण मोबा. 9404450056 यांच्याशी संपर्क साधावा.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!