शिरगाव शाखाप्रमुख किरण गोठणकर यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणेंच्या धक्कातंत्राने ठाकरे गट घायाळ

देवगड तालुक्यातील शिरगाव धोपटेवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख किरण गोठणकर व सौ.गौरी गोठणकर यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन आणि केंद्रीय उद्योग मंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या मार्गर्शनाखाली काम करण्यासाठी या कुटुंबीयांनी भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश केला. कणकवली येथे किरण गोठणकर आणि गौरी गोठणकर यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.
या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, नंदू देसाई,प्रदीप देसाई, शशिकांत गोठणकर, पिंटू लाड गावकर,उमेश गोठणकर आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!