रिल मेकर्ससाठी ‘रिलशहाणा २०२४’ स्पर्धा जाहीर

पहिलं पारितोषिक एक लाख रुपयांचं
विषय आहे ‘कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊलखुणा’
१ मे रोजी कुडाळला भव्य पारितोषिक वितरण सोहळा
निलेश जोशी । कुडाळ : तुम्हाला रिल्स बनवता येतात का तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. नाही बनवता येत असतील तरी सुद्धा हि बातमी तुमच्या फायद्याचीच आहे. काय आहे कि कोकणातली एक मोठी रिल्स तयार करण्याची स्पर्धा जाहीर झालीय. रिलशहाणा यांच्या मार्फत ‘रिल शहाणा २०२४’ या भव्य अशा रिल्स तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरीसह पालघर, ठाणे आणि रायगड येथील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र ते या स्पर्धेचे पहिले पारितोषिक आहे. त्या व्यतिरिक्त इतर ६ वेगळी बक्षिस सुद्धा आहेत. कोकणचा कॅलिफोर्निया-विकासाच्या पाऊलखुणा या विषयावर हि स्पर्धा असून. २९ हि रिल पाठवण्याची शेवटची तारीख आहे. दि. १ मे रोजी कुडाळ येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यात याचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. त्याबद्दल या स्पर्धेच्या आयोजकांनी कुडाळ यथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी माहिती देताना निलेश गुरव, तेजस मसके आणि रुचिता शिर्के यांनी सांगितले कि, कोकणचा कॅलिफोर्निया – विकासाचाच्या पाऊलखुणा या विषय या स्पर्धेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यावर मराठी-मालवणी यापैकी कोणत्याही भाषेत ९० सेकंदाचे रील तयार करून ते रील पोस्ट करताना @reel_shahana या ऑफिशियल अकाउंट ला टॅग करणे गरजेचे आहे. तसेच #reel शहाणा हा हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे. @reel_shahana हे या स्पर्धेसाठी इंस्टाग्राम अकाउंट आहे. तसेच रील पोस्ट करताना @reel_shahana या इंस्टाग्राम अकाउंटला कोलॅब रिक्वेस्ट पाठवावी लागेल. हिच स्पर्धेमधील एन्ट्री म्हणुन ग्राह्य धरली जाईल स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश शुल्क नाही ही स्पर्धा पूर्णतः विनामुल्य आहे.
या स्पर्धेचे पहिले पारितोषिक रोख रुपये १ लाख, द्वितीय रोख रुपये ५० हजार आणि तिसरे पारितोषिक रोख रुपये २५ हजार आहे. त्याशिवाय या प्रत्येक विजेत्याला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल या व्यतिरिक्त आठ वैयक्तिक बक्षिसे सुद्धा आहेत. त्यामध्ये रीलशहाणा अभिनेता, रीलशहाणा अभिनेत्री, रीलशहाणा संगीत, रीलशहाणा लेखक,रीलशहाणा DOP,, रीलशहाणा एडिटर, रीलशहाणा संकल्पना, रीलशहाणा दिग्दर्शक, यांचा समावेश आहे. त्यासाठी सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे याचे स्वरूप आहे.
त्याशिवाय एक विशेष पारितोषिक सुद्धा देण्यात येणार आहे. ज्या रीलला जास्तीत जास्त लाईक असतील अशा रील ला मोस्ट लाईकडं हे पारितोषिक देण्यात येईल. तसेच कन्टेन्ट बेस मध्ये तो रील उजवा असल्यास संबधीत प्रथम, द्वितीय, तृतीय पैकी बक्षिस सुद्धा सदर रीललाच देण्यात येईल. सर्व पारितोषिके १ मे दिवशी पारितोषिक वितरण सोहळ्यात जाहीर करण्यात येतील. त्यासाठी सर्व स्पर्धकांनी २ तास अगोदर कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला निलेश गुरव, तेजस मसके, रुचिता शिर्के, आबा आईर, हर्षु जोशी उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.