शिडवणे येथे २२ मार्च रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय व जिल्हास्तरीय गावठी बैल गटात होणार स्पर्धा
सुमारे दीड लाख रुपये रकमेची रोख बक्षिसे व आकर्षक ढाल
कणकवली तालुक्यातील शिडवणे या गावातील श्री देव गांगो रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्यावतीने सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी भव्य राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व जिल्हास्तरीय गावठी गट बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिडवणे गंगेश्वर मंदिर समोरील रान माळ मैदानावर करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मंडळाच्या वतीने सुमारे दीड लाख रुपयांची रोख रकमेची पारितोषिके व आकर्षक ढाल देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
श्री देव गांगो रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीचे हे दुसरे वर्ष असून यावेळी रोख रकमांच्या बक्षीसामध्ये मंडळाने वाढ केली असून राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत प्रथम आलेल्या विजेत्याला रोख २५,००१ व आकर्षक ढाल देण्यात येणार आहे.तर द्वितीय क्रमांक – २०,००१ व ढाल,तृतीय क्रमांक – १५,००१ व ढाल,चतुर्थ क्रमांक – १०,००१ व ढाल तर पंचम क्रमांकास – ५,००१ व ढाल देण्यात येणार आहे.
याबरोबरच जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यती करीता प्रथम क्रमांक विजेता स्पर्धकाला २०,००१ व ढाल तर द्वितीय क्रमांकास – १५,००१ व ढाल,तृतीय क्रमांक – १०,००१ व ढाल,चतुर्थ क्रमांक – ७,००१ व ढाल,पंचम क्रमांक – ५,००१ व ढाल,सष्टम क्रमांक – ३,००१ व ढाल,सप्तम क्रमांक –
२,००१ व ढाल आदी बक्षिसे देण्यात येणार आहेत.तसेच जिल्हास्तरीय गावठी गट सर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला – ५,००१ व ढाल,द्वितीय क्रमांक – ३,००१ व ढाल,तृतीय क्रमांक – २,००१ व ढाल आदी बक्षीसे देण्यात येणार आहेत.
शिडवणे केसरी – २०२६ या नावाने ओळखणारी ही बैलगाडा शर्यत स्पर्धा शिडवणे रवळनाथ मंदिरच्या समोर दुपारी १२ ते सायं.५ या वेळेत संपन्न होणार आहे.तरी या बैलगाडा शर्यत स्पर्धेत जास्तीत जास्त सर्धकानी सहभाग घ्यावा.असे आवाहन श्री देव गांगो रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.





