रामनवमी उत्सवानिमित्त वाहतूक व्यवस्थेबाबत नियोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या उपस्थितीत झाली बैठक संपन्न

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा रामनवमी उत्सव बुधवार १७एप्रिल रोजी संपन्न होत आहे.या निमित्त भाविकांची होणा-या गर्दीचे आणि वाहन पार्किंगचे नितोजं या दृष्टीने दैवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या उपस्थितीत देवस्थान कार्यालयात बैठक संपन्न झाली.या बैठकीत रामनवमी उत्सवात येणाऱ्या भाविकांना रामेश्वराचे दर्शन सुलभ व्हावे, राम जन्मोत्सव सोहळ्याचा आनंद घेता यावा यादृष्टीने नियोजन करण्यात आले.यादृष्टीने मंदिर प्रवेश द्वाराजवळील दोन्ही बंगल्यामध्ये प्रवेश करणे बाहेर जाणे या दृष्टीने व्यवस्था करायची ठरली. दुपारचा महाप्रसाद सर्वांना व्यवस्थित घेता यावा गडबड गोंधळ उडू नये या दृष्टीने आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवणेबाबत विचारविनिमय करण्यात आला.तसेच उत्सवाला येणाऱ्या भाविकांची वाहन पार्किंग व्यवस्था आदी बाबत पाहणी करून बैठकीत नियोजन करण्यात आले.या बैठकीत देवस्थान समिती सचिव अशोक पाडावे, समिती सदस्य रविंद्र गुरव,आचरा उपसरपंच आणि देवस्थान मानकरी संतोष मिराशी, तसेच अभय भोसले, जयप्रकाश परुळेकर, अर्जुन बापर्डेकर, रामचंद्र घाडी, गुरुनाथ कांबळी,विजय कदम,मंगेश मेस्त्री, पोलीस हवालदार महेश जगताप यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
आचरा–अर्जुन बापर्डेकर