वायंगणी सरपंच अस्मि लाड यांच्या गावच्या विकासकामांच्या पाठपुराव्यांना यश

पालकमंत्री चव्हाण यांनी गावच्या विकासकामांसाठी दिला ४० लाख रुपयांचा भरघोस निधी
खारेपाटण : कणकवली तालुक्यातील वायंगणी गावच्या विकासात्मक कामांसाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यांचे वायंगणी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने वायंगणी सरपंच अस्मि लाड यांनी आभार मानले आहेत.प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी आभार मानताना व्यक्त झाले की, वायंगणी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निवड झाल्या नंतर रवींद्र चव्हाण साहेब यांची मुंबई येथे तसेच आमच्या कणकवली विधानसभेचे आमदार नितेशजी राणे साहेब यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन गावच्या विकास कामांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी सरपंच अस्मि लाड व सोबत उपसरपंच प्रताप फाटक, सदस्य अनुक्रमे -ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी यांनी मागणी केली होती.
आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्याने या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्याची विनंती पालकमंत्री महोदयांकडे केली होती ती लगेच मान्य करत जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत या कामासाठी १२ लक्ष रुपये मंजूर करून दिला. तसेच गावातील मौजे वायंगणी गावठाण ताम्हणकरवाडी कडे जाणारा रस्ता ग्रा.मा. १७ हा नादुरुस्त झाला असून त्यासाठी देखील १० लक्ष व १५ लक्ष असा निधी मजूर केला आहे. तसेच मौजे वायंगणी संभाजी बाणे घर ते ओहोळ कडे जाणार रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी ३ लक्ष निधी असा एकूण वायंगणी ग्रामपंचायत करिता रुपये ४० लक्ष निधी मंजूर केला आहे.
सतत च्या पाठपुराव्याना अखेर यश मिळाले असून, आमच्या वायंगणी गावच्या विकासकामासाठी निधी मंजूर करून दिल्या बद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांचे वायंगणी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने मी सरपंच अस्मि लाड, उप सरपंच श्री. प्रताप फाटक, ग्रामपंचायत सदस्य संभाजी बाणे, वनिता सुतार, उज्वला लाड, भारती परब, भाग्यश्री बाणे व ग्रामस्थांनी जाहीर आभार व्यक्त करते असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
अस्मिता गिडाळे / कोकण नाऊ / खारेपाटण