सावंतवाडीत २१ एप्रिलपासून शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे आयोजन

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित ‘शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबीर उन्हाळी सुट्टीतील दि.२१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित केले आहे. मागील प्रशिक्षण शिबिरातील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर खास लोकाग्रहास्तव प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढ करुन दहा दिवसीय विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील फिरंगोजी शिंदे आखाड्याचे संचालक वस्ताद प्रमोदजी पाटील यांच्या अनुभवी टीमसह प्रत्येक शिबिरार्थीना वैयक्तिक मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होणार आहे. शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबीर (लाठी-काठी,तलवार, दांडपट्टा)

या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रवेश मर्यादित असून प्रथम येणा-यांना प्रथम संधी या तत्वावर दिनांक १७ एप्रिल पर्यत प्रवेश दिला जाईल मात्र अपेक्षित शिबिरार्थी संख्या पूर्ण झाल्यावर प्रवेश दिला जाणार नाही.
नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी किशोर चिटणीस(9421073383) किंवा राजू केळुसकर(7083974400)अभिनव स्टोअर्स मच्छिमार्केट सावंतवाडी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन अभिनव फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.प्रसाद नार्वेकर आणि सचिव अण्णा म्हापसेकर यांनी केले आहे.

सावंतवाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!