नांदगाव रेल्वे स्टेशन वर तुतारी रेल्वे ला थांबा मिळण्यासाठी रेल रोको

26 फेब्रुवारी रोजी नियोजन बैठक
उपस्थित राहण्याचे आवाहन
नांदगाव पंचक्रोशीतील सर्वांना जवळ असलेले नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येथे तुतारी रेल्वेला थांबा मिळण्यासाठी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. नांदगांव रेल्वे स्टेशन या ठिकाणी मागील कोरोना काळापासून तुतारी रेल्वे ला थांबा बंद केलेला आहे. वारंवार संबंधित विभागांना व मंत्री यांना विनंती करूनही अद्याप पर्यंत रेल्वे थांब्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे येत्या काळात रेल रोको करण्यात येणार आहे अशी माहिती वाघेरी माजी सरपंच संतोष राणे यांनी दिली. आणि त्याच्या नियोजनासाठी दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता नांदगांव रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी नियोजन बैठक आयोजित केली आहे. सर्वांनी गावातील व परिसरातील जास्तीत जास्त ग्रामस्थानी उपस्थित रहावे. यावेळी रेल रोको ची तारीख व वेळ निश्चित करून रेल्वे प्रशासनास संबंधित तुतारी रेल्वे गाडी थांबविण्यासाठी एकजुटीने आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री राणे व पंचक्रोशी संघटनेच्या वतीने देण्यात आली.
दिगंबर वालावलकर /कणकवली