लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आतापासून कामाला लागा

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांचे वैभववाडीच्या मेळाव्यात प्रतिपादन
शिवसेनेकडून सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी मेळाव्याचे आयोजन
वैभववाडी येथे घेण्यात आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात महायुतीच्या उमेदवाराला 80 टक्के मतदान मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला.सुवर्ण मंगल कार्यालय वैभववाडी येथे शिवसेना शिंदे गट यांचा मेळावा संपन्न झाला.या मेळाव्याला जिल्हा प्रमुख संजय आग्रे,विधानसभा प्रमुख संदेश पटेल तालुका प्रमुख संभाजी रावराणे, माजी सभापती रमेश तावडे यांच्या सह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सदर मेळाव्यात तालुक्यातील सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला.महायुतीच्या उमेदवाराला तालुक्यात होणाऱ्या मताच्या 80 टक्के मतदान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी केला.यावेळी जिल्हा प्रमुख संजय आग्रे,विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांनी कार्यकर्त्यांना आजपासून कामाला लागा. वाडी वाडी वस्ती वस्ती घरा घरात जाऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश दिले.यावेळी तालुका अध्यक्ष संभाजी रावराणे तसेच रमेश तावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वैभववाडी प्रतिनिधी