मांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण प्रथम

गोरक्षनाथ मित्रमंडळ, कलमठ द्वितीय तर श्री गणेश मित्रमंडळ, जानवली तृतीय

स्पर्धकांनी रसिक प्रेक्षकांना ठेवले हसवत

कै. सुरेश अनंत धडाम स्मृतीनिमित्त महापुरुष मित्रमंडळातर्फे झेंडा चौकात आयोजित केलेल्या मांडावरील हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर मालवण संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गोरक्षनाथ मित्रमंडळ, कलमठ-गोसावीवाडीने द्वितीय तर श्री गणेश मित्रमंडळ, जानवलीने तृतीय क्रमांक मिळवला. अस्सल मालवणी क्रिएशन, कणकवलीने उत्तेजनार्थ प्रथम तर सिंधुदुर्ग, मालवणने उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षण गाव गाता गजाली फेम तथा अभिनेते विश्वजित पालव व श्याम नाडकर्णी यांनी केले.


दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक दत्ता सापळे व महापुरुष मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राजन पारकर दादा नार्वेकर, नीलेश धडाम, मंदार सापळे, काशिनाथ कसालकर, दिलीप पारकर, अनिल मुंज, शशिकांत कसालकर, बापू पारकर,आनंद पोरे,हरिष उचले, हर्षल अंधारी, निखिल घेवारी,विकास काणेकर, संदीप अंधारी, प्रद्युम मुंज,चेतन अंधारी, प्रज्वल वर्दंम,सोहम वाळके,गौरेश सापळे, वृषभ मेनकुदळे, सूरज ओरस्कर, सर्वेश शिरसाट,दत्ता तोरसकर,यांच्यासह मंडळातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गणेश कलमंच, जानवली या संघातील कलाकारांनी ‘नटीचे काय’, कलमठ जि. प. बाजारपेठ नंबर १ च्या विद्यार्थ्यांच्या रेकॉर्ड स्क्रिप्टवर, मालवणी संघातील कलाकारांनी ‘दगडु अण्णा’ या विषयावर कलाविष्कार सादर केले. दुसऱ्या दिवसी कळसुली येथील गंगाराम सुद्रिक आणि सीताराम सुद्रिक यांनी विनोदी कलाविष्कार सादर केला. गोरक्षणाथ मित्रमंडळ, कलमठ-गोसावीवाडी संघाने आले देवाजीच्या मना यावर कलाविष्कार सादर केला. सिंधुरत्न मालवण संघाने ता त्यांचा पडतेय यावर कलाविष्कार सादर केला. कलांकुर मालवण संघाने डॉक्टर डॉक्टर वर कलाविष्कार सादर केला. यातील सहभागी संघातील कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून एका पेक्षा एक सरस परफॉर्मन्स केले. ही स्पर्धा पाहण्यासाठी रसिकप्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.
आज रात्रौ ९ वा. रंगणार राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा कणकवली बाजारपेठच्या मांडावर आज रात्री ९ वा. मांडावरील राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कुडाळ, नेरूळ यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महापुरुष मंडळाने केले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!