‘सिमी’ संघटनेवर बंदी; केंद्रापाठोपाठ राज्य शासनानेही काढले आदेश

सिंधुदुर्गनगरी – बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची २९ जानेवारी २०२४ रोजीची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील ५ वर्षांसाठी ही बंदी असणार आहे. याविषयी राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच संबंधितांवर न्यायाधिकरणाची नोटीस बजावण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच कार्यवाहीबाबत शपथपत्रे दाखल करून ती राज्य शासनाकडे जमा करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

error: Content is protected !!