गाबीत समाजाचा शिमगोत्सव व महोत्सव 24,25 व 26 मे रोजी देवगड मध्ये होणार….
अखिल भारतीय गाबीत समाजाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांची घोषणा
देवगड – अखिल भारतीय गाबीत समाज,गाबीत समाज महाराष्ट्र, गाबीत समाज सिंधुदुर्ग व गाबीत समाज देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा “गाबीत शिमगोत्सव व गाबीत महोत्सव” 24,25,व 26 मे 2024 रोजी देवगड मध्ये आयोजित करण्यात येईल.असे सूतोवाच अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष श्री.परशुराम उपरकर यांनी देवगड येथील बैठकीत बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर डोंबिवली अध्यक्ष श्री.धर्माजी पराडकर,तालुकाध्यक्ष श्री.संजय पराडकर, अ.भा.कार्याध्यक्ष श्री.दिगंबर गांवकर,सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर,महाराष्ट्र गाबीत समाज अध्यक्ष श्री.सुजय धुरत उपस्थित होते.
सदर बैठकीस देवगड तालुक्यातील विविध गावातील शिमगोत्सव प्रमुख तसेच गाबीत समाज कार्यकर्ते उपस्थित होते.
तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर,महाराष्ट्र सरचिटणीस श्री.बाळा मणचेकर,तालुका सचिव श्री.संजय बांदेकर, लक्षुमन तारी,बाळा मुणगेकर,रमेश तारी,धर्मराज जोशी,डी.बी.कोयंडे,प्रवीण सारंग वगैरे पदाधिकाऱ्यांनी देवगड तालुक्यातील आडबंदर, मोर्वे, तांबळडेग,मिठमुंबरीं, बागबाडी,किल्ला,आ,नंदवाडी,मळई,आनंदवाडी,कालवी,कट्टा, टेंबवली,तळवडे,विजयदुर्ग, गिऱ्ये, आंबेरी,मोंड, वानीवडे, मणचे , विरवाडी वगैरे गावात शिमगोत्सव मांडाना 2 दिवस भेटी देऊन त्यांचेकडून पुर्वांपार चालत आलेल्या घुमट वादन,रोंबाट,फाग्, वगैरे लोककलांची माहिती संकलित केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी दिली. या सर्व वाड्यातील ग्रुपना बोलावून गाबीत महोत्सवात एकत्रित शिमगोत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊन बंदिस्त सभागृहात 3 दिवसांचा गाबीत महोत्सव साजरा करण्यात येईल.गतवर्षी मालवण दांडी येथे 27 ते 30 एप्रिल मध्ये 4 दिवस गाबीत शिमगोत्सव साजरा करण्यात आला होता.परंतु यावर्षी निवडणुकांचा काळ असल्याने मे अखेरीस हा महोत्सव करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.पहिला दिवस शिमगोत्सव आणि उर्वरित 2 दिवस गाबीत महोत्सव साजरा केला जाईल.त्यासाठी देवगड तालुका संघटना येत्या दोनतीन दिवसात तालुका दौरा करून गाबीत समाज बांधवांना महोत्सवाची माहिती देतील. तसेच समाजाचे सभासद नोंदणी मोहीम राबवतील.
दिनांक 11 एप्रिल रोजी बैठक घेऊन त्यामध्ये आयोजन समिती व सांस्कृतिक समिती नेमली जाईल.
यावेळी देवगड येथील “गाबीत भवन उभारणीच्या कमकाजासंबंधी सविस्तर माहिती सभागृहातील उपस्थितांना देण्यात आली. शेवटी श्री.धर्मराज जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.