सोलो लावणी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम
आंब्रड पाचाचा मांड शिमगोत्सवानिमित्त आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : श्री भगवती देवी श्री गांगेश्वर देवस्थान आंब्रड पाचाचा मांड शिमगोत्सव निमित्त आयोजित जिल्हास्तरीय सोलो लावणी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली.
जिल्हास्तरीय सोलो लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन कै लक्ष्मण दाजी परब यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्धाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आबा परब गावकर, विजय परब गावकर, सदानंद परब गावकर, अखिल आंब्रड ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मधुकर परब, मुबंई सरचिटणीस प्रकाश परब, सचिव प्रा दिनेश राणे, निवृत्त पोलीस अधिकारी अशोक मसुरकर, माजी सैनिक दत्ताराम परब, ऍड विठोबा मसुरकर, माजी उपसरपंच अनंत परब, माजी उपसरपंच विजय परब, विनोद मसूरकर, माजी सैनिक सदाशिव नाईक सामाजिक कार्यकर्ते संदीप परब कार्यक्रमाचे संयोजक हेमंत राऊळ, परीक्षक तृप्ती मेस्त्री, निलेश कदम, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम मृणाल सावंत कुडाळ, द्वितीय निधी खडपकर, सावंतवाडी, तृतीय दुर्वा पावसकर, कुडाळ, चतुर्थ पारितोषिक रोनी जाधव,देवगड, पाचवे पारितोषिक श्रीधर पिगुळकर पिंगुळी, सहावे पारितोषिक नंदिनी बिले सावंतवाडी यांनी मिळविला. उत्कृष्ट नर्तक म्ह्णून रोशन कर्वेकर बेळगांव आणि उत्कृष्ठ नर्तिका हर्षदा गावकर यांची निवड करण्यात आली
सर्व विजेत्यांना रोख रक्कम भव्य आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले माजी सभापती अरविंद परब, माजी पोलीस अधिकारी अशोक मसुरकर, विनोद परब, सौ सरिता परब, शेखर परब हे स्पर्धेचे प्रायोजक होते. संपूर्ण स्पर्धेचे निवेदन निवेदन निलेश कदम यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.